Tuesday, May 23, 2023

कोकम सरबत | Kokam Sarbat In Marathi

 

नमस्कार मंडळी !


आज आपण कोकम सरबतं कसे करायाचे हे पाहणार आहोत. 

कोकम  सरबत | Kokam Sarbat 



कोकम सरबत –
साहित्य – अर्धी वाटी कोकम आगळ, १ वाटी साखर,  चमचा धणे-जीरे पावडरचवीनुसार मीठ (आवडत असल्यास काळे मीठ घ्यावे) पुदिना, थंड पाणी.

कृतीएका मोठ्या पातेल्यात अर्धी वाटी कोकम आगळ घ्या, त्यात थंड पाणी टाका त्यात एक वाटी साखर टाका मग चवीनुसार मीठ किंवा काळे मीठ टाका मग त्यामध्ये धणे-जीरे पावडर टाका, थोडे पुदिन्याचे पाने टाका एक सर्विंग ग्लासमध्ये बर्फ घालून सर्व करावे.
अश्याप्रकारे आपले कोकम सरबत तयार!

Thursday, May 18, 2023

स्ट्रॉबेरी ज्युस | Strawberry Juice Recipe in Marathi

स्ट्रॉबेरी ज्युस | Strawberry Juice

नमस्कार मंडळी !


आज आपण  स्ट्रॉबेरि ज्युस कसे करायाचे हे पाहणार आहोत..


साहित्य : 12-14 स्ट्रॉबेरि, साखर, काळे मिठ, लिंबू, पुदिना, बर्फाचे तुकडे आवडीनुसार..

कृती :

स्ट्रॉबेरिचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे स्ट्रॉबेरि, साखर, लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून बारीक करावे. सर्व मिश्रण गाळून घेऊन  एकत्र केल्यावर ग्लास मध्ये काढून घ्यावे. मिश्रण ग्लास मध्ये ओतल्यावर वरून पुदिना व बर्फ आणि स्ट्रॉबेरिचे बारीक तुकडे घालावेत आणि सर्व्हिंग ग्लासमध्ये थंडगार स्ट्रॉबेरिचे सरबतं सर्व्ह करावं.

अश्याप्रकारे आपले स्ट्रॉबेरिचे सरबतं तयार!

Tuesday, May 16, 2023

मँगो लस्सी | Mango Lassi Recipe in Marathi.

नमस्कार मंडळी !

आज आपण मँगो लस्सी कसे करायाचे हे पाहणार आहोत

Mango Lassi | मँगो लस्सी


साहित्य:  हापूस आंब्याचा गर किंवा तुकडे, २ वाट्या थंड गोड दही, पाव वाटी क्रीम, ३- ४ टेस्पून साखर (आंब्याच्या गोडीनुसार साखर घ्यावी) , १/२ टीस्पून वेलचीपूड, १/४ टीस्पून केशर, चिमूटभर मीठ, १ ग्लास  थंड पाणी, सजावटीसाठी २-३ पुदिनाची पाने. 


मँगो लस्सी 
कृती : मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे / गर, साखर, केशर, क्रीम एकत्र करून वाटून घ्यावे. 

त्यातच दही, वेलचीपूड घालून एकत्र फिरवून घ्यावे. नंतर पाणी बर्फ घालून लस्सीला फेस येईपर्यंत घुसळावे 

तयार लस्सी सर्विंग ग्लासमध्ये ओतावी व वरून आंब्याचे तुकडे, केशर व आवडत असल्यास ड्राय फ्रुट्स व पुदिनाची पाने घालून सजवावे. 

अश्याप्रकारे आपली थंडगार मँगो लस्सी तयार..


Monday, May 15, 2023

कैरीच पन्हं | Kairichi Panha Recipe In Marathi

 नमस्कार मंडळी !



आज आपण कैरीच पन्हं कसे करायाचे हे पाहणार आहोत

कैरीच पन्हं | kairichi panha 


साहित्य : २ मोठया कैऱ्या, २ वाटी गुळ किंवा साखर, काळेमीठ सजावटीसाठी २-३                          पुदिना, वेलची पावडर,  बर्फ. 


कृती :  कुकरमध्ये कैरी उकडून घ्या. त्यानंतर कैरीचे सालं काढून कैरीचा गर काढून घ्या,  कैरीचा गर आणि गूळ किंवा साखर यापैकी जे घालणार असाल ते एका बाऊलमध्ये चांगलं एकजीव करून घ्यात्यात थोडीशी वेलचीपूड टाका. सर्व  मिश्रण गाळणीने गाळून घ्या. आपला  पन्ह्यासाठी लागणारा कैरीचा पल्प तयार झाला. हा पल्प तुम्ही हवाबंद बरणीत भरून फ्रिजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकताआता एक ग्लास थंड पाणी घ्या. त्यात दोन टेबलस्पून कैरीचा पल्प घाला. चिमुटभर काळे मीठ टाका. सर्विंग ग्लास मध्ये बर्फ टाकून मिश्रण चांगलं हलवून घ्यासजावटीसाठी २-३ पुदिना टाका. 

अश्याप्रकारे आपले कैरीचं थंडगार आंबटगोड पन्हं झालं तयार..

Sunday, May 14, 2023

कलिंगडाचा ज्यूस | कलिंगडाचे सरबतं | Watermelon Juice Recipe in Marathi

नमस्कार मंडळी !

 
आज आपण कलिंगडाचे सरबतं कसे करायाचे हे पाहणार आहोत..


साहित्य : कलिंगड, साखर, काळे मिठ, लिंबू, पुदिना, बर्फाचे तुकडे आवडीनुसार..


कृती :

कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे त्यातील बिया काढून टाकाव्यात. मिक्सरमध्ये कलिंगड,साखर, लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून बारीक करावे. सर्व एकत्र झाल्यावर ग्लास मध्ये काढून घ्यावे. ग्लास मध्ये ओतल्यावर वरून पुदिना व बर्फ आणि कलिंगडाचे बारीक तुकडे घालावेत आणि सर्व्हिंग ग्लासमध्ये थंडगार कलिंगडाचे सरबतं सर्व्ह करावं.

अश्याप्रकारे आपले कलिंगडाचे सरबतं तयार!


Friday, May 12, 2023

खरबुजाचे सरबत | Kharbuja Sarbat | मस्क मेलन ज्युस | Muskmelon Juice Recipe in Marathi

नमस्कार मंडळी !


आज आपण खरबुजाचे सरबतं कसे करायाचे हे पाहणार आहोत.. 

खरबुजाचे सरबत | Kharbuja Sarbat | Muskmelon Juice | मस्क मेलन ज्युस 
 

साहित्य : १ छान पिकलेले खरबुज, १/२ टिस्पून लिंबाचा रस, पुदिना पाने २-३, काळं मिठ, हवी असल्यास  साखर,

कृती:

खरबुजाच्या फोडी करून  घ्या, त्यात  थोडे लिंबू रस घाला, चवीपुरते  काळं मिठ घ्यावे. खरबुजाच्या फोडी मिक्सर मध्ये फिरून घ्यावे मग मोठया गाळणीने गाळून घ्यावे.  तयार ज्युसची चव पाहावी. खरबुज फार गोड असेल तर  साखर घालण्याची गरज नाही.  पण लागल्यास १ ते २ चमचे घालावी. ज्युस फ्रिजमध्ये गार करावा. पुदिना पाने घालून सर्विंग ग्लास मध्ये सरबत सर्व्ह करावे. 

अश्याप्रकारे आपले  खरबुजाचे सरबत तयार!


Thursday, May 11, 2023

बेलाचे सरबत | Belache Sarbat Recipe in Marathi

 नमस्कार मंडळी !


आज आपण बेलाचे सरबतं कसे करायाचे हे पाहणार आहोत.. 

बेलाचे सरबत | Belache Sarbat 

 बेलाचे सरबत –

साहित्य   वाटी पिकलेले बेलफळातील गर, गुळ  वाटी, लिंबू १वेलची २, काळी मिरी  , पुदिन्याची  पाने, मीठ चवीनुसार.

कृती  पिकलेले पिवळे बेलफळे घेऊन त्याचा गर काढून घ्यावा त्यानंतर गर थोड्यावेळ पाण्यात भिजत ठेवावा, मग गर पाण्यात कुस्करून हे मिश्रण 
गाळून घ्यावेत्यानंतर  आपल्या लागेल तसे त्यात 
पाणी घालावे.  गाळलेल्या मिश्रणात नंतर गुळ, मीठ वेलचीची पूड, काळी मिरी पावडर घालावी  पुन्हा गाळून घ्यावेसर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फ व पुदिन्याची  पाने घालावी सरबत प्यायला देतेवेळी त्यात बेताचे 
पाणी  बर्फ घालून गार सरबत द्यावे.

 अश्याप्रकारे आपले  बेलाचे सरबत तयार!


Tuesday, May 9, 2023

चिंचे चे सरबत | Chinche che Sarbat Recipe in Marathi

नमस्कार मंडळी !


आज आपण चिंचे चे सरबतं कसे करायाचे हे पाहणार आहोत

चिंचे चे सरबत | Chinche che Sarbat 

चिंचे चे सरबत –

साहित्य – अर्धी वाटी चिंचोके काढलेली चिंच, २ वाटया चिरलेला गूळ, १ चमचा धणे-जीरे पावडर,  चवीनुसार मीठ (आवडत असल्यास काळे मीठ घ्यावे).

कृती – रात्री चिंच पाण्यात भिजत घालावी व सकाळी ती गाळून घ्यावी. गाळलेल्या चिंचेच्या कोळात गूळ, धणे-जीरे पावडर मिसळून ते एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवावे. सरबत प्यायला देतांना ग्लासमध्ये थोडेसे कोळाचे मिश्रण घालून बाकी गार पाणी घालावे. चवीनुसार मीठ किंवा काळे मीठ टाकून सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फ घालून सर्व करावे.

                                                                                    अश्याप्रकारे आपले चिंचे चे सरबत तयार!


Monday, May 8, 2023

पुदिना ताक | Pudina Tak Recipe in Marathi


नमस्कार मंडळी !


आज आपण पुदिना ताक कसे करायाचे हे पाहणार आहोत 

पुदिना  ताक | Pudina Tak

पुदिना  ताक –

साहित्य: एक वाटी दही, ७-८ पुदिना पाने, थोडी कोथिंबीर, एक छोटी मिरची,  काळे मीठ, धनेजिरे पूड,   १ छोटा ग्लास पाणी 



कृती:

प्रथम एका भांड्यात घट्ट दही घ्यावे , मिक्सरला बारीक चिरलेला पुदिना, मिरची आणि कोथिंबिर एकत्र करून वाटून  घ्यावे. नंतर त्यात मीठ, धने जिरे पूड  घालावा. वाटलेली पेस्ट व  पाणी टाकून पुन्हा एकदा नीट एकत्र करून  घ्यावे. सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फ घालून सर्व करावे. अश्याप्रकारे आपले पुदिना ताक तयार!

Sunday, May 7, 2023

लिंबू पाणी सरबत | Limbu Pani Recipe in Marathi



नमस्कार मंडळी!

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची मात्रा फारच कमी होते. त्यामुळे शरीरात तत्काळ उर्जेची गरज असते अश्यावेळी आपणास निंबू पाणी कमी वेळात ताजेतवाने बनवून आपणास गर्मी पासून वाचविते. उन्हाळ्यात मुलांना स्टॅमिना साठी निंबू पाणी हे थंड पेय फारच चवदार आणि आरोग्यदायी आहे. चला तर जाणुया निंबू पाणी कसे बनवायचे.


निंबू पाणीसाठी लागणारी सामग्री:

v  रसदार निंबू

v  पाणी

v  साखर

v  सैंधव मीठ

v  भिजवलेला सब्जा

v  पुदिन्याची पाने



Nimbu Pani Recipe
निंबू पाणी बनविण्याचा विधी:

उन्हाळ्यात लिंबूपाणी तयार करण्यासाठी २ चमचे साखर, पुदिन्याची पाने आणि ५ चमचे लिंबाचा रस घ्या. यानंतर साखर आणि पुदिन्याची पाने यांची बारीक पेस्ट बनवा. आता एक ग्लास पाण्यात पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिक्स करा, सैंधव मीठ, भिजवलेला सब्जा, आणि त्यात लिंबाचा रस घाला नंतर चमच्याने मिसळा. झालं!, तुमचं लिंबूपाणी तयार आहे. लिंबाच्या काप करुन ग्लास सजवा आणि सर्व्ह करा..