Tuesday, May 16, 2023

मँगो लस्सी | Mango Lassi Recipe in Marathi.

नमस्कार मंडळी !

आज आपण मँगो लस्सी कसे करायाचे हे पाहणार आहोत

Mango Lassi | मँगो लस्सी


साहित्य:  हापूस आंब्याचा गर किंवा तुकडे, २ वाट्या थंड गोड दही, पाव वाटी क्रीम, ३- ४ टेस्पून साखर (आंब्याच्या गोडीनुसार साखर घ्यावी) , १/२ टीस्पून वेलचीपूड, १/४ टीस्पून केशर, चिमूटभर मीठ, १ ग्लास  थंड पाणी, सजावटीसाठी २-३ पुदिनाची पाने. 


मँगो लस्सी 
कृती : मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे / गर, साखर, केशर, क्रीम एकत्र करून वाटून घ्यावे. 

त्यातच दही, वेलचीपूड घालून एकत्र फिरवून घ्यावे. नंतर पाणी बर्फ घालून लस्सीला फेस येईपर्यंत घुसळावे 

तयार लस्सी सर्विंग ग्लासमध्ये ओतावी व वरून आंब्याचे तुकडे, केशर व आवडत असल्यास ड्राय फ्रुट्स व पुदिनाची पाने घालून सजवावे. 

अश्याप्रकारे आपली थंडगार मँगो लस्सी तयार..


No comments:

Post a Comment