नमस्कार मंडळी!
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची मात्रा फारच कमी होते. त्यामुळे शरीरात तत्काळ उर्जेची गरज असते अश्यावेळी आपणास निंबू पाणी कमी वेळात ताजेतवाने बनवून आपणास गर्मी पासून वाचविते. उन्हाळ्यात मुलांना स्टॅमिना साठी
निंबू पाणी हे थंड पेय फारच चवदार आणि आरोग्यदायी आहे. चला तर जाणुया निंबू
पाणी कसे बनवायचे.
निंबू
पाणीसाठी लागणारी सामग्री:
v
रसदार निंबू
v पाणी
v साखर
v सैंधव
मीठ
v भिजवलेला
सब्जा
v पुदिन्याची पाने
निंबू पाणी बनविण्याचा विधी:
उन्हाळ्यात
लिंबूपाणी तयार करण्यासाठी २ चमचे साखर, पुदिन्याची पाने आणि ५ चमचे लिंबाचा रस घ्या.
यानंतर साखर आणि पुदिन्याची पाने यांची बारीक पेस्ट बनवा. आता एक ग्लास पाण्यात पुदिन्याच्या
पानांची पेस्ट मिक्स करा, सैंधव मीठ, भिजवलेला सब्जा, आणि त्यात लिंबाचा रस घाला नंतर
चमच्याने मिसळा. झालं!, तुमचं लिंबूपाणी तयार आहे. लिंबाच्या काप करुन ग्लास सजवा आणि
सर्व्ह करा..
No comments:
Post a Comment