नमस्कार मंडळी !
आज आपण पुदिना ताक कसे करायाचे हे पाहणार आहोत
पुदिना ताक | Pudina Tak
पुदिना ताक –
साहित्य: एक वाटी दही, ७-८ पुदिना पाने, थोडी कोथिंबीर, एक छोटी मिरची, काळे मीठ, धनेजिरे पूड, १ छोटा ग्लास पाणी
कृती:
प्रथम एका भांड्यात घट्ट दही घ्यावे , मिक्सरला बारीक चिरलेला पुदिना, मिरची आणि कोथिंबिर एकत्र करून वाटून घ्यावे. नंतर त्यात मीठ, धने जिरे पूड घालावा. वाटलेली पेस्ट व पाणी टाकून पुन्हा एकदा नीट एकत्र करून घ्यावे. सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फ घालून सर्व करावे. अश्याप्रकारे आपले पुदिना ताक तयार!
No comments:
Post a Comment