आज आपण चिंचे चे सरबतं कसे करायाचे हे पाहणार आहोत
चिंचे चे सरबत | Chinche che Sarbat
चिंचे चे सरबत –
साहित्य – अर्धी वाटी चिंचोके काढलेली चिंच, २ वाटया चिरलेला गूळ, १ चमचा धणे-जीरे पावडर, चवीनुसार मीठ (आवडत असल्यास काळे मीठ घ्यावे).
कृती – रात्री चिंच पाण्यात भिजत घालावी व सकाळी ती गाळून घ्यावी. गाळलेल्या चिंचेच्या कोळात गूळ, धणे-जीरे पावडर मिसळून ते एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवावे. सरबत प्यायला देतांना ग्लासमध्ये थोडेसे कोळाचे मिश्रण घालून बाकी गार पाणी घालावे. चवीनुसार मीठ किंवा काळे मीठ टाकून सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फ घालून सर्व करावे.
अश्याप्रकारे आपले चिंचे चे सरबत तयार!
No comments:
Post a Comment