नमस्कार मंडळी !
आज आपण कैरीच पन्हं कसे करायाचे हे पाहणार आहोत
कैरीच पन्हं | kairichi panha
साहित्य : २ मोठया कैऱ्या, २ वाटी गुळ किंवा साखर, काळेमीठ सजावटीसाठी २-३ पुदिना, वेलची पावडर, बर्फ.
कृती : कुकरमध्ये कैरी उकडून घ्या. त्यानंतर कैरीचे सालं काढून कैरीचा गर काढून घ्या, कैरीचा गर आणि गूळ किंवा साखर यापैकी जे घालणार असाल ते एका बाऊलमध्ये चांगलं एकजीव करून घ्या. त्यात थोडीशी वेलचीपूड टाका. सर्व मिश्रण गाळणीने गाळून घ्या. आपला पन्ह्यासाठी लागणारा कैरीचा पल्प तयार झाला. हा पल्प तुम्ही हवाबंद बरणीत भरून फ्रिजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकता. आता एक ग्लास थंड पाणी घ्या. त्यात दोन टेबलस्पून कैरीचा पल्प घाला. चिमुटभर काळे मीठ टाका. सर्विंग ग्लास मध्ये बर्फ टाकून मिश्रण चांगलं हलवून घ्या. सजावटीसाठी २-३ पुदिना टाका.
अश्याप्रकारे आपले कैरीचं थंडगार आंबटगोड पन्हं झालं तयार..
No comments:
Post a Comment