नमस्कार मंडळी !
आज आपण खरबुजाचे सरबतं कसे करायाचे हे पाहणार आहोत..
खरबुजाचे सरबत | Kharbuja Sarbat | Muskmelon Juice | मस्क मेलन ज्युस
साहित्य : १ छान पिकलेले खरबुज, १/२ टिस्पून लिंबाचा रस, पुदिना पाने २-३, काळं मिठ, हवी असल्यास साखर,
कृती:
खरबुजाच्या फोडी करून घ्या, त्यात थोडे लिंबू रस घाला, चवीपुरते काळं मिठ घ्यावे. खरबुजाच्या फोडी मिक्सर मध्ये फिरून घ्यावे मग मोठया गाळणीने गाळून घ्यावे. तयार ज्युसची चव पाहावी. खरबुज फार गोड असेल तर साखर घालण्याची गरज नाही. पण लागल्यास १ ते २ चमचे घालावी. ज्युस फ्रिजमध्ये गार करावा. पुदिना पाने घालून सर्विंग ग्लास मध्ये सरबत सर्व्ह करावे.
अश्याप्रकारे आपले खरबुजाचे सरबत तयार!
No comments:
Post a Comment